हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- तळेगाव बाजार येथे श्री रामकृष्ण भड यांचे गावालगत अडगाव रोडवरील वाडित दत्त संस्थान येथे दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहा अंतर्गत ५ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९ या दरम्यान कलशाची स्थापना करण्यात आली होती.
तेथे दररोज श्री रामराव भड महाराज यांच्या वाणीतून श्री गुरुचरित्र कथा ऐकविण्यात आली. दि १२ डिसेंबर गुरुवार २०१९ रोजी ग्रंथची समाप्ती होवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले इथे विशेष म्हनजे गावाजवळिल शेतकर्याच्या वीहीरी आटलेल्याअसून याच्यांवाडितील विहीरीत पन्नास फुट पानी आहे श्रीदत्तकृपेणे रामकृष्न भड यांचे याच विहिरीवर बारमाही बागाईतअसते त्यांची व कूंटुबाची श्रीदत्त भंगवतावर खुप श्रद्धा आहे.औदुंबराच्या सूकलेल्या झाडावर भंगवत रचना केली आहे गावातिल वआमंञित भाविकानी भड वाडी येथेआयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला










