अकोट प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना अकोट व तेल्हारा तालुक्यातील आढावा बैठक नुकतीच अकोट शिवाजी पार्क अकोट येथे संपन्न झाली. यावेळी अकोला जिल्हाचे अध्यक्ष अहेमदभाई, उपाध्यक्ष निरंजन गावंडे, माजी जिल्हाध्यक्ष गोपाल नारे,प्रकाश आम्ले,यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी अकोट तालुका उपाध्यक्ष स्वप्निल सरकटे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अहेमदभाई व माजी जिल्हाध्यक्ष गोपाल नारे गुजरकर काका यांनी नियुक्तीपत्र देवून केली.