बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातिल ग्रामबोर्डी येथे दि. 11/12/2019 ला सायंकाळि 8:30 ते 10:30 या वेळेत श्री नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे अखिल भारतिय अंधश्रध्दा निर्मूलन समिती अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने बाबा ते बाबा अभियान 2019 चा कार्यक्रम शांततेत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनोहर गये बोर्डी हे होते.तर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहूणे अशोक घाटे, नरेंद इंगळे, विलास ठोसर, अरुण सांगळूदकर, घनशाम दाते, हे होते. अशोक घाटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन बाबत लोकांना सविस्तर माहिती दिली. यावेळेस मंचावर गावातील देवीदास बुले, सुभाष लटकूटे, रमेश पाटील खिरकर, तुळशीराम इस्तापे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक योगेश कडू यांनी केले. सदर कार्यक्रमाला गावातील बहुसंख पुरुष मंडळी, महिला मंडळी,युवा तरुण मंडळी, प्रामुख्याने उपस्थिती होती.