तेल्हारा(प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात शिकत असलेली कु. लक्ष्मी सुरेश कोरडे हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. उन्हाळी २०१९ मध्ये झालेल्या एम. कॉम. (वाणिज्य पारंगत) मधून नववी मेरिट येण्याचा मान प्राप्त केला आहे. कु.लक्ष्मी कोरडे हिने सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम बी भुसारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एम.पी. चोपडे प्रा. एम एम कवरके, प्रा. डॉ. गणेश खेकाळे श्री शिवाजी महाविद्यालय अकोला. प्रा. डॉ. कृष्णा माहुरे, प्रा.आर.व्हि.लोणकर, मंगेश देवतळे, सचिन ढोले उपस्थित होते.










