हिवरखेड (दिपक रेळे)- शेतकरी मजूर वर्गात भिती हिवरखेड च्या मोराळी शेतशिवारात अस्वल या प्राण्यांने त्याची एक दहशत निर्माण केली आहे, दिनांक ११ डिसेंबरच्या सकाळी 9 वाजताच्या दरम्यान इम्रहान खान किफायत खान, व किशोर नाठे यांच्या शेतात अस्वल हे तुरीच्या तासात बसलेले होते, या दरम्यान त्या शेतातील शेतकरी गवत काढत असतांना त्याला अस्वल दिसले, तसेच ताबडतोब बाजूला असलेले किशोर नाठे यांना त्यानि सांगितले व या दोघांनी भीतीपोटी त्याच्या मित्राना सांगितले तसेच तेथील मजूर वर्ग अस्वल याला घाबरायला लागला ,शेतकरी किशोर नाठे यांचे मित्र बाळासाहेब भोपळे, दसरथ गावंडे, संजू ओंकारे,अन्सार खा, बबलू ,यांनी अस्वलाला तेथून पळून लावले, अस्वलाने पळ काढला परंतु शेतकरी व मजूर यांची भीती कमी नाही झाली, वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी मजूर वर्ग करीत आहे