पातूर (सुनील गाडगे)- ग्रामगीता विचार युवा मंच अकोला यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५०व्या सुवर्ण पुण्यतिथि महोत्सवानिमित्त जिल्ह्यात ५० गावांत नित्यनियमित सामुदायिक प्रार्थना सुरु करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी दि. ७ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी पातूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल आणि विकासापासुन वंचित असलेले पातूर येथुन तब्बल ५० कि.मी. अंतरावर असलेले चोंढी येथे ३२व्या सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभम पांडुरंग वरणकार यांनी केले. प्रा. विलास राऊत व शेख सर, कीर्तनकार श्रीकृष्ण सावळे गुरूजी तसेच डॉ. रामजी उपाध्याय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चोंढी ग्राम वासियांनी दररोज नित्यनियमित सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प घेतला. कार्यक्रमाला प्रा. विलास राऊत, बाळाभाऊ सरोदे, श्रीकृष्ण सावळे गुरूजी, पत्रकार देवानंद गहिले, संदीप गिऱ्हे, प्रविण पोहरे, पंकज पोहरे, माणिक ठाकरे, ग्रामगीता विचार युवा मंचचे जिल्हा समन्वयक प्रा. शुभम वरणकार, मुकेश वाकोडे, प्रदीप गिऱ्हे, दिलीप कराळे, डॉ. रामजी उपाध्याय, प्रणय सातपुते, पार्थ दिवनाले, दिलीप पस्तापुरे, गजानन ठाकरे, सुरेश खुळे, विशाल राऊत, य. रा. ठाकरे, रामदास मार्शिडकर यासह गावातील गुरुदेव प्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती.