अकोला (प्रतिनिधी) : यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्विंटल मूग विक्रीस आला; परंतु दरात चढ-उतार सुरू असून, जास्तीचे दर पुन्हा प्रतिक्विंटल ५,६०१ वरू न ५,४११ रुपयांवर खाली आले. असे असले तरी सरासरी दर मात्र प्रतिक्विंटल ५,३०० रुपयांवर होते.
यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याचा परिणाम मूग, उडीद पिकावर झाला आहे. दरवर्षी १५ आॅगस्टपासूनच नवीन मुगाची आवक सुरू होते. तथापि, यावर्षी सप्टेंबर महिन्यात आवक सुरू झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी ५२ क्विंटल आवक होती. ६ सप्टेंबर रोजी यात वाढ होत ९२ क्विंटलपर्यंत आवक वाढली. दरात चढ-उतार सुरू असल्याने शुक्रवारी मुगाचे कमीत कमी दर प्रतिक्विंटल ४,२०१ रुपये होते.जास्तीचे दर ५,४११ तर सरासरी दर हे ५,३०० रुपयांवर पोहोचले. यावर्षी मुगाचे हमी दर प्रतिक्विंटल ७ हजार ५० रुपये जाहीर करण्यात आले आहेत. त्या तुलनेत बाजारात कमी दर आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांनी मूग घरी ठेवल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उडिदाची आवकही ५२ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. उडिदाला प्रतिक्विंटल कमीत कमी ४,६०० जास्तीत जास्त ४,९०० तर सरासरी दर ४,८०० रुपये आहेत. सोयाबीनची आवकही ९३२ क्विंटल होती. सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ३,५२५ रुपये दर मिळाले. हरभºयाची आवकही बºयापैकी ३०८ क्विंटल असून, सरासरी दर ३,९५० रुपये होते. शरबती गव्हाचे दर सरासरी दर २,६०० तर लोकल गव्हाचे दर २,१०० रुपये आहेत. लोकल ज्वारीचे सरासरी दर १,८७५ रुपये प्रतिक्विंटल आहेत.