तेल्हारा (प्रा विकास दामोदर)- स्थानिक प्रज्ञावंत बुद्ध विहार येथे दि.23 मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभा अकोलाच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करून सभेचे आयोजन करण्यात आले, सदर सभेत तेल्हारा तालुका तथा शहर कार्यकारिणीचे पुनःर्गठन करण्यात आले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हाध्यक्ष पि.जे.वानखडे गुरुजी, कोषाध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष भाऊसाहेब थोरात, कार्यालयीन सचिव सदाशिव मेश्राम, संघटक किरण पळसपगार तथा रामेश्वर गायकवाड उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरवात तथागत चरणी पुष्प, धूप,दीप अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली. आदरणीय वानखडे गुरुजींनी नवनिर्वाचित सदस्यांच्या नावाची घोषणा केली ज्यामध्ये नाजूकराव दारोकार यांची तालुकाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी चार वेगवेगळी विभाग असलेले उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली ज्यात प्रा. विकास दामोदर (प्रचार प्रसार व पर्यटन विभाग ), भीमराव तायडे (संस्कार विभाग), रेखाताई अरुण सिरसाट (माहीला विभाग ), रवींद्र खर्चे (संरक्षण विभाग )तसेच महासचिव पदी नागसेन तायडे, कोषाध्यक्ष पदी अविनाश वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली . वरील वेगवेगळ्या चार उपाध्यक्ष विभागात प्रत्येकी 2 सचिव, हिशेब तपासणीस व संघटक असे 14 पदे तालुका कार्यकारिणीच्या वतीने निवडण्यास आदेशीत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेत सिद्धार्ध शामस्कार गुरुजी यांच्या मार्गदर्शनात, प्रा. संजय हिवराळे, गोवर्धन पोहरकार, पंजाबराव दुसेकर, प्रमोद गवई, सुमेध गवारगुरू, रोशन दारोकार, जिवन बोदडे, मिलिंद वानखडे ई. बोद्ध उपासक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागसेन तायडे, प्रास्ताविक प्रा. विकास दामोदर तर आभार प्रदर्शन गोवर्धन पोहरकार यांनी मानले शेवटी सरनत्तयंने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचे सामाजितील सर्वच स्तरातील लोकांकडून अभांनंदन केले जात आहे.