तेल्हारा( प्रतिनिधी)-राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी जयपूर येेेथे 20 व 22 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय एथेलेटिक्स स्पर्धेत तेल्हारा येथील एथेलेटिक्स यांनि विविध खेडा च्या शर्यत मध्ये प्रथम क्रमांक मिळून नाव लौकिक केले आहे यात तेल्हारा येथील विद्यार्थी बुद्धभूषण भारसाकळे याने एथेलेटिक्स 5 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर सुरज भोजने याने गोळाफेक ओपन वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला,पवन बोदडे याने अंडर 17 वयोगटामध्ये 200 मिटर रनींग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, शेखर हिवराळे याने अंडर 20 वयोगटामध्ये 200 मिटर रनींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर अमित दामोदर यांने याने ओपन वयोगटातील 400 मिटर रनींग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने आई ,वडीलाच्या आशीर्वादाने तर शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले नाव उज्वल केले आहे.
सर्व विद्यार्थी हे अत्यंत गरीब साधारण कुटुंबातील असून आई वडील हे मजुरी व्यवसाय करतात तरी सुद्धा या मुलांनी कठोर मेहनत व घेतलेल्या जिद्दीच्या भरवश्यावर यश गाठले आहे. विद्यार्थी यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांनी सॉल्वो स्पोट्स गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव राहुल चव्हाण सर यांना दिले आहे त्यांच्या या यशाने सम्पूर्ण अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुक्यात त्यांच्यावर आनंदाचे थाप पडत आहे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे