अकोला(प्रतिनिधी): – दिनांक ०१/०१/२०२६ रोजी रेल्वे स्टेशन चौक अकोला येथे नाकाबंदी करीत असतांना पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथील पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे व पोस्टेचे डि.बी. पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे आधारे आरोपी नामे शब्बीर उर्फ शब्या हुसेन बेनीवाले वय ३२ वर्ष, सैलानी चक्की जवळ, गवळीपुरा अकोला यांचे ताब्यातुन एक लोखंडी (स्टीलची) ३२.४ ईचाची मोठी धारधार तलवार कि.अ. १२००/रू चा मुददेमाल जप्त करून आरोपी यांचे विरूध्द पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे अप.न.०१/२६ कलम ४,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही अर्चित चांडक पोलीस अधिक्षक अकोला, बी.पी. रेडडी सा, अप्पर पोलीस अधिक्षक सा, सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अकोला, यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे पोलीस स्टेशन रामदासपेठ, व पोस्टाफ दादाराव टापरे, पो.कॉ. श्याम मोहळे, अनिल धनभर, इमाम चौधरी, अभिजीत इगळे, मोहम्मद जाकीर, आशुतोष गवळी, अंकीत कमलाकर, रवी नागे, रमेश गंगलवार सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केली.











