अकोट (प्रतिनिधि) : अकोट दर्यापुर राज्य महामार्गावर अकोट मतदार सघांच्या हद्यीपर्यत रोडवर मोठ मोठे जिवघेणे खड्डे पडले असुन अकोट मतदार सघांचे आमदारासह या रोडवरुन हजारो प्रवाशी दररोज प्रवास करीत असून नागपूर कडे जाणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग असून या रोडवर अकोट पासून ते अकोट मतदार संघाच्या हद्दीत पर्यंत जीव घेणे मोठं मोठे खड्डे पडले असून या रोडच्या दोन्ही बाजूच्या किनारा खचल्या आहेत. तर या रोडची पूर्णता चाळणी झाली त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात खड्डे चुकवण्याच्या नादात होत असुन काही निष्पाप नागरीकाना आपले प्राण गमवावे लागले आहेत.तर काहींना आपले कायमचे अपंगत्व आले आहे. या जीवघेण्या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.तरी सा.बा अकोट उपविभागात हजर नसतात त्यामुळे सतांपलेल्या शिवसैनीकानी त्याच्या खाली खुर्चीला बेशरम फुलाचा मोठा गुच्छा अर्पण केला उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी अनेक भाविक भक्तांची वरदळ या रोडवरून होणार आहे तरी या रोडवरील खड्याना शिवसैनीकानी पाढंरा रंगाच्या निशाण्या मारुन प्रवाशानी खड्डे बुजवण्या पर्यत सावधान पुर्वक प्रवास करण्याचे आव्हान केले आहे तरी त्वरीत खड्डे बुजविल्यास शिवसेना स्टॉईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना नेते दिवाकर रावते, पश्चिम संपर्क प्रमुख अरविंद सावंत, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख शाम गावंडे यांच्या मार्गदर्शनात सदर आंदोलन राहुल पाचडे च्या नेतृत्वात करण्यात आले. या अभिनव आंदोलनात रोशन पर्वतकार, गोपाल म्हैसने, नंदू कुलट, सागर गीते, नितीन सोनोने, नंदू सपकाळ, विशाल चौधरी, अनुभव कराळे, शाम मेंढे, अक्षय टेकडे, कुणाल पाचडे, सचिन काकड, रवी कोगदे, शैलेश देवळे, अजय पाचडे, शाम वाकोडे, मुन्ना भरणे, आकाश गीते, प्रफुल गुप्ता, प्रथमेश पाचडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : पूर्णा मायच्या स्वच्छतेसाठी सरसावली तरुणाई; स्वयंस्फूर्तीने राबविले स्वच्छपूर्णा अभियान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










