पातूर : पातूर येथील मुजावरपुरा भागात बीजबिरा मशीदीजवळ असणाऱ्या एका विहीरीत पाय घसरुन पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील निवासी मात्र सध्या दहीहांडा येथे सासरवाडीला आपल्या पत्नीसोबत राहणारे व कामानिमित्य पातूर ला आलेले अब्दुल समीर अब्दुल रशीद ( वय अंदाजे३५) मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास म्हशींना पाणी पाजण्यासाठी मुजावरपुरा भागातील बीजबिरा मशीदीजवळ असणाऱ्या विहीरीवर गेले असता पाय घसरुन विहीरीत पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाल्यावरही ते घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सायंकाळी सदर विहीरीजवळ त्यांची सायकल, चप्पल आणि पाणी भरण्यासाठीचे बॅरल आढळून आले. त्यामुळे त्यांनी विहीरीत पाहिले असता अब्दुल समीर अब्दुल रशीद हे विहीरीत मृतावस्थेत आढळले. यासंदर्भात पातूर पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने पातूरच्या नागरिकांनी सदर विहीरीजवळ गर्दी केली. पातूरचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. पातूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola