मुंबई : राज्यात मूग, उडीद व सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया हंगाम 2018-19 साठी सुरु आहे. या अंतर्गत 8 ऑक्टोबर अखेर प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुगासाठी 6 हजार 183, उडीद – 8 हजार 851 व सोयाबीनसाठी 5 हजार 307 अशी एकूण 20 हजार 341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मूग व उडीदाच्या नोंदणीसाठी 15 दिवसांचा कालावधी वाढविला असून तो 24 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. तसेच मूग व उडीद खरेदी 11 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : पोषण माह अभियान : महाराष्ट्राला १४ पुरस्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola









