मूर्तिजापुर : येथील प्रतिभावंत नगर येथे ज्ञान नर्मदा बहुउद्देश्यीय संस्था द्वारा संचालित हॅपी वुमन्स क्लब ची आढावा बैठक दिनांक 8 रविवार रोजी सोशल डिस्टसिंग चे पूर्ण पालन करून घेण्यात आली.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन करुण कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली या नंतर हॅपी वुमन्स परिवाराच्या जेष्ठ सदस्या स्व डॉ कल्पना ताई बियानी यांना श्रधांजलि देण्यात आली.यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.यावर्षी दिवाळी निमित्त गरजू, गरीब,कुष्ठरोगी,दिव्यांग लोकांना फराळाचे वाटप करायचे ठरवन्यात आले व त्या बाबत नियोजन करण्यात आले
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ अमीता तिड़के तर प्रमुख अतिथि सौ राधिका सिकची उपस्थित होत्या थंडीचे दिवसात गरजुंना उबदार कपडे उपलब्ध करुण देन्याचा मानस दिपाली देशमुख यानीआपल्या विचारातून व्यक्त केला यावेळी कल्पना तिड़के, जया टाले, वर्षा लोडम ,विभुति लोडम,पल्लवी मुळे यांची उपस्थिती होती.