• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मूर्तीजापुर तालुक्यात भाजपाचा दूधासाठी महाएल्गार आंदोलन

Media Desk by Media Desk
August 3, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
भाजपा
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

मुर्तिजापूर (महेश सावळे)- महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान अशा विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते. या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता ना. संजय धोत्रे (केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार), .आ. रणधीर सावरकर (भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला), यांच्या मार्गदर्शनाखाली .आ.हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली आज मूर्तिजापूर येथे महाएल्गार आंदोलन करण्यात आले. मूर्तिजापूर येथील शासकीय दूध संकलन व शितकरण केंद्र मूर्तिजापूर तसेच छत्रपती शिवाजी चौक मूर्तिजापूर, यात्रा चौक सिरसो, लाखपूरी, धोत्रा शिंदे, बिडगाव, माना, कुरुम, बपोरी, येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रीतेश सबाजकर, मोनालीताई गावंडे (नगराध्यक्षा न.प. मूर्तिजापूर), सचिन देशमुख (भाजयुमो जिल्हाध्यक्ष अकोला), सौ.मानके ताई तालुकाध्यक्ष महिला मोर्चा,पप्पू पाटील मुळे (भाजयुमो तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर), हर्षल साबळे (भाजयुमो शहराध्यक्ष मूर्तिजापूर), अनिल ठोकळ (शेतकरी आघाडी), प्रशांत हजारी( शेतकरी आघाडी )तसेच हजारो कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Previous Post

हॉटेल राणा वाईन बारच्या मालकावर प्राणघातक हल्ला

Next Post

बोर्डी येथे सावकारग्रस्त शेतकरी बहुउद्देशीय सेवा समिती स्थापन……

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ourakola

बोर्डी येथे सावकारग्रस्त शेतकरी बहुउद्देशीय सेवा समिती स्थापन......

मूर्तिजापूर

आमच्या घराचा गुदमरलेला श्वास मोकळा करा,अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या घरमालकाची शासन दरबारी कैफीयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.