मूर्तिजापूर (महेश सावळे)- आतिक्रमणाच्या विळख्यातील आपले घर मोकळे करून घाणीच्या साम्राज्यातून आम्हाला बाहेर काढा व आमच्या जिविताला निर्माण झालेला धोका दूर करा, अशी मागणी सिरसोचे अजय प्रभे यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनानुसार ग्राम पंचायत सिरसो अंतर्गत भटोरी रस्त्यावरील बँक कॉलनीत अजय प्रभे यांचे भुखंड क्रमांक ३२ वर स्वतःच्या मालकीचे घर आहे. त्याच्या घराच्या पूर्वेकडे दर्यापूर व दक्षिणेकडे भटोरी रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यांवर घरासमोर अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले आहे. हे आतिक्रमणधारक त्यांच्या घरातील सर्व संडसाचे घाण पाणी कचरा रस्त्यावर व माझ्या घरासमोर टाकतात व घाण करतात. त्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या व परीसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर अतिक्रमणे काढून आपल्या घराचा गुदमरलेला श्वास मोकळा करावा, आमच्यासह परीसरातील रहिवाश्यांना अभय द्यावे, आमचे आरोग्य व जीवन वाचवावे, अशी मागणी करणाऱ्या या निवेदनाच्या प्रति तहसीलदार, सरंपच व ग्राम सचिवांना देण्यात आल्या आहेत.