बोर्डी (देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे आज रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सावकारग्रस्त शेतकरी बहुउद्देशिय सेवा समिती स्थापन करण्यात आली आहे.तरी शासन दरबारी या समितीची दी.28/2/2020 ला नोंद झाली आहे. नोंदणी क्रमांक 325/2019 एफ 20210 हा आहे.तरी ही समिती सावकारग्रस्त शेतकर्यानच्या तक्रारीचे निवारण करुन शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करनार आहे.या करिता ही समिती स्थापन करण्यात आली असुन समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील खिरकर बोर्डी हे आहेत.तरी जिल्ह्यातील समस्त सावकारग्रस्त शेतकर्यांना आपल्या तक्रारी समितीकडे सादर करण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील खिरकर बोर्डी यांनी केले आहे.