पातूर (सुनिल गाडगे)- वाशीम मार्गावरील हॉटेल राणा वाईन बार येथे दि .१ / ८ / २०२० रोजी ४:३० वाजताच्या सुमारास 3 ते ४ युवकांनी येऊन हौदोस घातला.यात हॉटेल चे संचालक निरंजन महादेव कढोणे ( वय ५७ ) रा.गुरुवारपेठ , पातुर हे जखमी झाले असल्याची तक्रार पातूर पोलिसात दाखल केली आहे . ही संपूर्ण घटना हॉटेल वर असलेल्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाली असून त्याआधारे आरोपीची ओळख व शोध घेणे सुरू आहे . घटनेची हकिकत अशी आहे की यातील फर्यादी याचे हॉटेलवर वर जेवन न दिल्याच्या कारणाने ३ ते ४ व्यक्तीने काउंटरवर बसलेला फिर्यादीचा मुलगा सागर सोबत वाद घातला फीर्यादीने सदर वाद सोडविण्याचे प्रयत्न करीत असतांनी त्यातील एका अनोळखी व्यक्तीने त्याचे जवळील चाकु काढुन फीर्यादीच्या डाव्या हातावर मारला , त्यामुळे त्यांच्या हाताच्या करंगळीच्या बाजुला असलेल्या बोटाला चाकू लागुन रक्त निघाले .
सदर भांडणाच्या झटापटीत फिर्यादीचा मुलगा सागरच्या गळ्यातील ११ ग्रामची सोन्याची चैन पडली असून पातूर पोलिसात अप . नं . ४५२/२०२० कलम ३२४, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.या प्रकरणी पातूर येथील विशेष समजतील मोठ्या हुद्द्यावर असलेला एक अधिकारी दखल देत असून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहे. अश्या लोकांना चाप देण्यासाठी ठानेदारनी निःपक्ष पने प्रकरणाची चौकशी करावी. पुढील तपास व आरोपींचा शोध ठाणेदार गजाननसिंह बायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे सह पातूर पोलीस करीत आहेत .