• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठा सेवा संघाचे आधारवड शांताराम बापू कुंजीर यांचे निधन

Team by Team
May 5, 2020
in Featured, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 1
0
shantaram bapu

शांताराम बापू

33
SHARES
640
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे आधारवड आणि मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक शांताराम बापू कुंजीर यांचे आज (मंगळवार) पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले.

शांताराम बापूंचा अल्प परिचय

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

बापूंचे वडील स्मृतिशेष महादेव कुंजीर विहिरीच्या खोदकामाच्या सुरुंगाला बत्ती देण्याचे काम करीत असत. एक दिवस सुरुंगाला बत्ती दिल्यानंतर पाठीमागे वळाल्यानंतर त्यांना अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बापू लहान असताना वडिलांचा अकाली मृत्यूमुळे संसाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली आणि संघर्षमय जीवनाची सुरुवात झाली.. मुलांचे वडीलांचे छत्र हरपले, त्यामुळे बाप आणि आई अशा दोन्ही भूमिका या मातेला पार पाडाव्या लागल्या.. मोलमजुरी करून खेड्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे जिकिरीचे झाल्यामुळे दोन लहान मुले आणि आई असे हे कुटुंब पुण्यात आले. मुले संघर्ष करण्याच्या वयात येईपर्यंत आईने मिळेल ते काम करून मुलांचे संगोपन सुरू केले. आईच्या मदतीसाठी दोघे भाऊ काबाड कष्ट करू लागली.. मोठा मुलगा रामचंद्र मिळेल ते काम करून आईला मदत करू लागला आणि लहान मुलगा शांताराम बापू यांनी आई आणि मोठ्या बंधूंच्या मदतीने वाडिया कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर पुण्यात सिक्युरिटी गार्ड, पेपर टाकणे, दुधाच्या बाटल्या पोहोचविणे असे मिळेल ते काम करू लागले.

शांताराम कुंजीर यांनी वेगवेगळ्या 20 ठिकाणी नोकरी केली या काळात मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कामास सुरुवात केली आणि मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार ठुबे साहेबांच्या माध्यमातून 2005 मध्ये संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत झाले. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर फोडल्याचा गुन्हा शांतारामबापूंवर होता. विविध संघटनांच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, D.Ed. च्या विद्यार्थ्यांचा स्टॅयपेंड चा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, नवोदित लेखकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी आत्तापर्यंत दहा पुस्तकांचे प्रकाशन असे सामाजिक काम बापूंनी केले आहेत. संभाजी ब्रिगेड च्या विचारांनी प्रेरित होऊन नोकरीला रामराम ठोकला आणि व्यवसायाला सुरुवात केली. प्रचंड काबाडकष्ट करून बापूंनी त्यांच्या कुटुंबाला सोन्याचे दिवस मिळवून दिले आणि या संघर्षमय आयुष्याचा शेवट आज दि 05 मे 2020 रोजी झाला. आज पहाटे ही बातमी समजली.++ दुःखद बातमी ++

कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते मा. शांताराम बापू कुंजीर, पुणे यांचे काल रात्री उशिरा हृदय विकाराने दुःखद निधन झाले आहे. दिवंगत नेते शांताराम बापू मराठा महासंघ, मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चा सह विविध पुरोगामी चळवळीचे प्रणेते होते. मराठा आरक्षण सह शेकडो आंदोलनात सहभागी होते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा जेल मध्ये जावे लागले. दिवंगत शांताराम बापू मराठा समाजातील पूर्ण वेळ काम करत होते…

शांताराम बापू यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नाही तर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. ते महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना पुणे येथे हक्काचे आधार होते. या शब्दात मसेस संस्थापक ऍड पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार

 

Tags: मराठा क्रांती मोर्चामराठा सेवा संघविजयकुमार ठुबेशांताराम बापू कुंजीर
Previous Post

हिंगोलीत २२ जवानांसह एक परिचारिका पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ७६ वर

Next Post

कोरोनाच्या महामारीत डॉक्टरचे कोरोनाबाधित रुग्णा सोबत अश्लील चाळे; डॉक्टर निलंबित

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
sexual-assualt-crime

कोरोनाच्या महामारीत डॉक्टरचे कोरोनाबाधित रुग्णा सोबत अश्लील चाळे; डॉक्टर निलंबित

prakash ambedkar

राज्यात आर्थिक आणिबाणी लागू करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून निर्बंध लादताना आगामी सहा महिन्याचे नियोजन देखील जाहीर करावे - वंचित बहुजन आघाडी.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.