मुंबई : एकीकडे ‘कोविड योद्धे’ डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार घेत आहेत. मात्र अशात मुंबईत ‘रुग्णसेवे’ला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टर तरुणाने उपचारादरम्यान आपल्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाने केला आहे.
काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचार्यांना कोरोना बाधा झाल्याने हे हॉस्पिटल सील करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालय सुरू झाल्यानंतर एक 44 वर्षे रुग्ण 30 एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल झाला. त्याला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले त्यानंतर एक 35 वर्षीय डॉक्टर दुसर्या दिवशी सकाळी या रुग्णाला तपासण्यासाठी गेला . आणि अचानक त्याने या रुग्णाच्या अंगावर चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्ण भयभीत झाला. तसेच डॉक्टरांना याबद्दलचा विचारू लागला मात्र डॉक्टरने त्याला झोपून राहा असे सांगितले. आणि शरीराच्या सर्व भागांवर चुंबन घेण्यास सुरुवात तसेच लैंगिक चाळे करू लागला रुग्णाने आक्षेप घेताच त्याने रुग्णाला शांत बसण्यास सांगितले. आणि डॉक्टर या विभागातून बाहेर पडला.
34 वर्षांच्या पुरुष डॉक्टरने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याचा आरोप 44 वर्षांच्या कोरोनाग्रस्त पुरुषाने केला आहे. आरोपी डॉक्टरविरोधात आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला अटक करण्याऐवजी राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात आयपीसी कलम 377, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरचा तो कामावरील पहिलाच दिवस होता. 30 एप्रिललाच हा डॉक्टर रुग्णालयात रुजू झाला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी दुष्कृत्य करणारा डॉक्टर निलंबित झाला आहे. डॉक्टरला ठाण्यातील त्याच्या राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याचं आग्रीपाडा पोलिसांनी सांगितलं