• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये

Media Desk by Media Desk
May 21, 2020
in Featured, अकोला जिल्हा, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
jee main exam 2020
13
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

बारावीच्या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस ज्या परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत, त्या तारखा आज जाहीर झाल्या. जेईई मेन, अॅडव्हान्स्ड आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई-मेन परीक्षा १८ जुलै २०२० ते २३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहे, असे डॉ. रमेश पोखरियाल यांनी सांगितले. नीट परीक्षादेखील २६ जुलै २०२० रोजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा ऑगस्ट २०२० मध्ये होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेतल्या जाणार याबाबतचा निर्णय येत्या १ ते २ दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली. डॉ. पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या तारखा जाहीर केल्या. विद्यार्थ्यांना या तारखा कळल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी JEE Main ही परीक्षा घेतली जाते. यंदा ९ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेला यंदा १५ लाख ९३ हजारांवर विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जातात.

देशातील विद्यापीठांमधील परीक्षा १ जुलैपासून घेणार. ऑगस्टपासून नवं सत्र सुरू करणार. कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जुलैनंतरही जर कुठल्या ठिकाणची परिस्थिती सामान्य नसेल तर तेथील आढावा घेऊन तसे निर्णय घेण्यात येतील, असे पोखरियाल म्हणाले.

विद्यापीठांमध्ये कोव्हिड – १९ टास्क फोर्स

प्रत्येक विद्यापीठात कोव्हिड – १९ टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश यूजीसीद्वारे देण्यात आले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या कोणत्या समस्या असतील तर त्या सोडवल्या जातील.
इंटरनेट सुविधा नसल्यास…

ज्या विद्यार्थ्यांकडे विशेषत: दुर्गम भागात इंटरनेटच्या सुविधा नसतील, याची आम्हाला जाणीव आहे, पण अशा वेळी विद्यार्थ्यांनी टीव्हीवर विविध चॅनेलवर सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गांचा लाभ घ्यावा. ३५ विविध वाहिन्यांवर हे अभ्यासक्रम २४ तास सुरू आहेत, असे ते म्हणाले.

आयआयटींना फी न वाढवण्याचे आवाहन

देशातल्या आयआयटी या स्वायत्त संस्था आहेत, त्यांना शुल्कवाढीसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. मात्र तरीही आम्ही त्यांना विनंती केली आहे की यावर्षी आयआयटींमधील शुल्क वाढवू नये.

Tags: JEE Mainजेईई-मेन परीक्षा 2020
Previous Post

राज्यात आर्थिक आणिबाणी लागू करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून निर्बंध लादताना आगामी सहा महिन्याचे नियोजन देखील जाहीर करावे – वंचित बहुजन आघाडी.

Next Post

एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अकोला जिल्हयातील तळीरामांसाठी खुशखबर, उद्या पासून मद्यविक्रीला प्रशासनाची परवानगी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
liquor shop alcohol daru

एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अकोला जिल्हयातील तळीरामांसाठी खुशखबर, उद्या पासून मद्यविक्रीला प्रशासनाची परवानगी

akola-corona-update-3-april-2020

३२ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, २१ निगेटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.