अकोला (जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींचे) अकोला येथे दिनांक २७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ५ या वेळामध्ये नाताळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नाताळ मेळाव्या मध्ये प्रशिक्षणार्थीनीव्दारे तयार केलेले व्यवसायानुरूप गृहोपयोगी साहीत्य, विविध बेकरी पदार्थ, फुड प्रोसेसिंगबाबतचे विविध पदार्थ, कल्पकतेने स्वता: डिझाईन तयार केलेले विविध पोषाख, विविध कापडी वस्तु, घर सजावटीसाठी आवश्यक वस्तु, इलेक्ट्रॉनिक व संगणकविषयी विविध माहीती, प्रशिक्षणार्थीनी स्वता तयार केलेले सौदर्य प्रसाधणे,फेस पॅक इत्यादीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात संस्थेत उपलब्ध असलेले विविध व्यवसाय अभ्यासक्रमाची तसेच विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. तरी अकोला शहरातील सर्व विद्यार्थीनी व महीलांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमोद भंडारे, प्राचार्य यांनी केले आहे.