अकोट (प्रतिनिधी): अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बचत गटात काम करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांना नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा उद्या आयोजित केला असून या सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक भरत इंगळे यांनी केले आहे. मंगळवार १० सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १ वाजता दर्यापूर मार्गावरील श्रद्धा सागर येथे तपेशवरी शिक्षण प्रसारक मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला, असून यावेळी प्रा.अनघा सोनखासकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष, तर भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शिलाताई खेडकर, वृषाली बडगुजर, ऍड भारती पुंडकर प्रमुख अतिथी आणि घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या अनुराधा घोरपडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाजप नेत्या नयना ताई मनतकार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. बचत गटांना मार्गदर्शन आणि नारी शक्ती पुरस्कार वितरण समारंभाला महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेने केले आहे.