हिंगणी (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील हिगंणि येथिल अशोक नराजे पाटील याचि शेतकरी सल्लागार समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दि ७ सप्टेबर रोजी दुपारी बारा वाजता कृषी कार्यालयात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे हे होते. शेतकरी सल्लागार समितीच्या तालुका अध्यक्ष पदासाठी अशोक नराजे पाटील याचे नाव स्मिताताई राजणकर यांनी सुचविले, तर अनुमोदन रमेश दुतोंडे यांनी दिले. या सभेला शंकरराव ताथोड, गजानन नळकांडे, सदानंद खारोडे, श्रिधर भारसाखळे, विजय इंगळे, वासुदेव कुमार, डॉ ऊद्वव विखे, अनिल कराळे, नथ्थुजि शेळके, सुदेश शेळके, एकनाथ ताथोड, सौ सुचिता शेळके, सौ संगिता गावंडे, सौ स्मिताताई ढोले ,सौ ज्योतिताई वसु, निलेश पत्कि, सौ रत्नप्रभा ग्रहांचे हे सदस्य उपस्थित होते. सभेचे संचालन सचिव निलेश नेमाडे यांनि केली, तर आभार प्रदर्शन अशोक नराजे यांनी केले सभेला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.