* पालकमंत्री व आमदारांना गावबंदी,तेल्हारा तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
तेल्हारा (प्रतिनिधी)- भारत राखीव बटालियन द्वारे कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे सांभाळण्यासाठी मदत होत असते सदरहू प्रकल्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडणेर शिवारात मंजूर झाला होता त्या जागेची मोजणी होऊन पदे सुध्दा मंजूर करण्यात आली होती परंतु सदर प्रकल्प इतरत्र वळविण्यात आल्या मुळे हा तालुक्यावर अन्याय आहे हा प्रकल्प तालुक्यातच झाला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस कमिटी च्या उपाध्यक्ष डॉ संजीवनी बिहाडे यांनी तेल्हारा येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये केले असून यापुढे पालकमंत्री व आमदार याना गावबंदी करण्याचा इशारा काँग्रेस राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिला
सदरहू प्रकल्प 2016 मध्ये मंजूर झाला होता त्या जागेची मंजुरी पूर्वी राखीव बटालियन कमांडर व महानिरीक्षक यांनी स्वतः त्या जागेवर जाऊन त्यांनी पाहणी करून त्यांनी सकारात्मक अहवाल दिला परंतु या , ना ,त्या कारणाने जागा हस्थांतरण चा प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आला तो प्रकल्प अकोला तालुक्यातील उदेगाव हिंगणा शिवारात वडविण्यात आला या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामध्ये कॅम्प साठी तेल्हारा तालुका योग्य नव्हता तर प्रथम त्यास का मान्यता देण्यात आली,तसाही हा तालुका विकासापासून कोसो दूर आहे हा प्रकल्प येथे झाला असता तर तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता पालकमंत्री संपूर्ण अकोला जिल्ह्याचे असतांना तेल्हारा तालुक्यावर हा अन्याय होणे योग्य नाही दळण वळणा चे मार्ग व संदेश वाहनांच्या सोयी तालुक्यात नाहीत म्हणून हा प्रकल्प सीसा उदेगाव येथे जात आहे हे पालकमंत्र्यांचे म्हणणे अजिबात सयुक्तिक वाटत नाही तरी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील व आ.प्रकाश भारसाकळे यांनी सदर प्रकल्प हा तेल्हारा तालुक्यातच राहावा या करिता प्रयत्न करावेत असे प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष डॉ संजीवनी बिहाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले व या पुढे हा प्रकल्प तालुक्यातच राहावा या करिता पालकमंत्री व आमदार यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला पत्रकार परिषदेला काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस डॉ अशोक बिहाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा प्रदीप ढोले ,काँग्रेसचे जिल्हा सचिव ओम शर्मा, सदस्य संदीप खारोडे,शहर अध्यक्ष सोनू मलीये,माजी प स सभापती अतुल ढोले,अन्सार पटेल ,युवक काँग्रेसच तालुका अध्यश अनंत सोनमाळे, विजय जायले,रजिया पटेल, आदी उपस्थित होते