मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी उत्साहात चित्रपटात काम करतात. नाविन्यपूर्ण भूमिकेमुळे बिग बींच्या नव्या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. आगामी चित्रपटातील लूकमुळे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सध्या अमिताभ बच्चन लखनऊ येथे आगामी चित्रपट ‘गुलाबो सिताबो’चे चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार करत आहेत. चित्रीकरण सुरू होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चित्रिकरणाआधी मी असा आत गेलो होतो, मात्र, चित्रिकरणासाठी तयार झालो तेव्हा असा झाला. नेमक काय झाले हे सांगणार नाही.’ असे चाहत्यांना सांगितले.
मात्र, बिग बींच्या या ट्विटमधील रहस्य फार काळ टिकले नाही. त्यांचा या चित्रपटातील लूक समोर आला. हा लूक सोशल मीडियावर वायरल होत आहे. या लूकमध्ये अमिताभ मोठी दाढी आणि चष्म्यासह एकदम वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. अमिताभ यांच्या या हटके लूकमुळे त्यांच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
T 3199 – गए तो ऐसे थे ऐसे , बाहर निकले शूटिंग के लिए तो ये बन गए ,,, क्या बन गए ये बता नहीं सकता अभी !???? pic.twitter.com/DOxKeVh7mg
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 19, 2019
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह आयुष्यमान खुराणादेखील असणार आहे. अमिताभ हे घरमालकाच्या भूमिकेत दिसणार असून आयुष्यमान खुराणा त्यांचा भाडेकरू असणार आहे. अमिताभ आणि दिग्दर्शक शुजित सरकार यांनी यापूर्वी ‘पिकू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
अधिक वाचा : इमरान हाश्मी-जॉन अब्राहम बनणार ‘गँगस्टर’, ‘या’ चित्रपटात येणार एकत्र
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola