• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 4, 2023
36 °c
Akola
36 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed
36 ° Thu
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड लेखणी

‘या’ पाच ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात असते पाहण्यासारखे

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in लेखणी, संपादकीय
Reading Time: 1 min read
78 1
0
‘या’ पाच ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात असते पाहण्यासारखे
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

उन्हाळा संपला असून आता अवघ्या काही दिवसातच मॉन्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. आता आपल्यापैकी अनेकांना पावसाळी पिकनिकचे वेध लागले असतीलच, पण आता नेमके जायचे कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही आज तुम्हाला पुणे आणि मुंबईजवळ असलेल्या पावसलाली पर्यटनस्थळांबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती ठिकाणे

हेही वाचा

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

पत्रपरिषद: बचतगटांच्या उत्पादनांचे ‘तेजस्विनी’ प्रदर्शन; प्रदर्शनाचा लाभ घेऊन महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे -उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार

मुंबईपासून 150 किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अगदी पाहण्यासारखे असते. येथील वळणदार घाटात पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण या ठिकाणी जाण्याआधी तुम्हाला घाटातील परिस्थिती तुम्हाला जाणून घ्यावी. कारण दरवर्षी या घाटात लहानमोठी दरडी कोसळत असतात. त्यामुळे येथे जाण्याआधी माहिती घेतलेली बरी.

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक पुणे-मुंबई दरम्यान असलेल्या लोणावळा आणि खंडाळा घाटातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी येतात. लोणावळा आणि खंडाळ्यात हिरव्यागार डोंगर रांगा, त्यातून वाहणारे धबधबे, डोंगरमाथ्यावर जमा होणारी धुक्याची चादर हा निसर्गाचा नजराणा पाहायला मिळतो. इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्लेसुद्धा या भागात असल्याने येथील परिसर पर्टकांना नेहमी आपल्याकडे खुणावत असतो.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील भडारदरा येथील ‘काजवा महोत्सव’ हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. निसर्गरम्य वातावरण अनुभवायचे असेल पर्यटकांनी पावसाळ्यात भंडारदऱ्याला भेट द्यालाच हवी. भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे.

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून साताऱा जिल्ह्यातील महाबळेश्वरची ओळख आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे. महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. भाम्बावली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, गोवित्री आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम याच भागात आहे.

 

बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या. पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्‍या अधिकच सुंदर दिसतात. ओबोलीचे मुंबईपासूनच अंतर 549 कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर 390 कि.मी. तर रत्नागिरी- आंबोली 215 कि. मी. आहे.

अधिक वाचा : का साजरा करतात फादर्स डे, जाणून घ्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

Next Post

आरोग्य निरोगी राखण्यासाठी दैनंदिन ‍दिनचर्येत योगाचा वापर आवश्यक : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

RelatedPosts

आळंदा
Featured

सैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव,माजी सैनिक झाला आळंदा ग्रामदान मंडळाचा अध्यक्ष

April 3, 2023
पत्रपरिषद
अकोला

पत्रपरिषद: बचतगटांच्या उत्पादनांचे ‘तेजस्विनी’ प्रदर्शन; प्रदर्शनाचा लाभ घेऊन महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे -उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार

March 22, 2023
journalists
Featured

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ साठी मुदतवाढ; दि.८ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

February 25, 2023
तेल्हारा
Featured

तेल्हारा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा कार्यगौरव सोहळा, तेल्हारा तालुका पत्रकार संघाचा उपक्रम.

January 7, 2023
सत्कार
Featured

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार …

January 6, 2023
समृध्दी
Featured

समृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट…! उदयापासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ…

December 14, 2022
Next Post
आरोग्य निरोगी राखण्यासाठी दैनंदिन  ‍दिनचर्येत योगाचा वापर आवश्यक : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आरोग्य निरोगी राखण्यासाठी दैनंदिन ‍दिनचर्येत योगाचा वापर आवश्यक : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अडगाव बु येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

अडगाव बु येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आपली प्रतिक्रिया Cancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

June 1, 2023
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी

विशेष लेख- शासन आपल्या दारी : योजनांची माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

June 1, 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

June 2, 2023
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

May 31, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks