रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे रेपो दर 5.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरात कपात झाल्यामुळे आता कर्ज आणखी स्वस्त होणार. याव्यतिरिक्त आरबीआयने ऑनलाईन व्यवहारावरील NEFT आणि RTGS चार्जेस हटवण्याचा निर्णय घेतला.
आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली. यामुळे 6 टक्के असणारा रेपो दर आता 5.75 टक्के इतका राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता बँकांकडून मिळणारे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. कर्जावरील व्याजदर कमी झाल्याचा नागरिकांना मोठा फायदा होईल. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारखेंचे हप्ते कमी होतील.
अधिक वाचा : UPSC परीक्षा होणार यादिवशी, वेळापत्रक जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola