कारंजा(प्रतिनिधी)– बांबर्डा ता.कारंजा (लाड) जिल्हा वाशिम येथील रहिवासी अनंता रामदास भेंडे पाटील वय अं. (42) वर्षे हे आपल्या शेताला लागुन असलेल्या उंद्री धरणात आपल्या शेतातून धरणात टाकलेली पाईपलाईन काढत असतांना धरणाच्या खोलभागातील पाण्यात बुडाल्याची माहिती कारंजा लाडचे उपविभागीय अधिकारी श्री.अनुप खांडे साहेबांनी फोनवरून पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली आणी शोधकार्य राबविण्यासाठी तात्काळ येण्यासाठी पाचारण केले. कारण घटनास्थळी गावपातळीवर नागरिकांनी शोध घेतला परंतु पाण्याची खोली आणी पाण्याचा परीसर मोठा असल्याने स्थानिकांना शोध कार्यात अडथळे निर्माण होत आहेत तरी आपण तात्काळ पोहचा. लगेच पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी महेश साबळे,ऋषीकेश तायडे,अकुश सदाफळे,मयुर जवके, आशिष गुगळे,गोविंदा ढोके,ऋतीक सदाफळे, आणी शोध व बचाव साहित्य आणी आपत्कालीन वाहनासह एका तासात घटनास्थळी पोहोचले आणी सर्च ऑपरेशन चालु केले. आणी एका तासात मृतदेह शोधुन बाहेर काढला. घटनास्थळी महसुलचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे सर आणी नायब तहसीलदार विनोद हरणे साहेब,आणी पोलिस विभागाचे पि.एस.आय.मानकर साहेब पि.एस.आय.जगदाळे साहेब व कारंजा येथील सासचे शाम सवाई आमी मोठया प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोट ब्रेकिंग- चारचाकीत बसला आणि गुदमरून मृत्यु झाला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola