अकोला(प्रतिनिधी)– जिल्ह्यातील पातुर तालुक्यात विजेचा कडकडाट तसेच जोरदार वाऱ्यासह बुधवारी रात्री ८ वाजता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
अकोल्यात गेले अनेक दिवसांपासून सर्वाधीक तापमान होते. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर निघणेही शक्य नव्हते. मात्र, बुधवारी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तर रस्त्यावर असलेल्या व्यावसायिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. तसेच या वादळ-वाऱ्यामुळे पातुरच्या घाटात एक ट्रक उलटल्याची माहिती आहे. मात्र, त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
अधिक वाचा : अकोट ब्रेकिंग- चारचाकीत बसला आणि गुदमरून मृत्यु झाला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola