अकोट(देवाणंद खिरकर)- अकोट तालुक्यातील दहिहंडा पोलिस स्टेशन अन्तर्गत येत असलेल्या वरुर जऊळका येथील महवितरणचे तांत्रिक कामगार निलेश काशिनाथ दळणकार वय 40 वर्ष यांना शनिवारी सकाळी झोपेत असताना आरोपी मुकेश उर्फ सागर बारब्दे वय 26 वर्ष ज्योती विठ्ठल बारब्दे वय 52 वर्ष वंदना शिवदास बारब्दे सर्व राहणार वरुर जऊळका यांनी त्यांच्या राहत्या घरात जाऊन सकाळी कुर्हाड़ीने डोक्यावर वार करुन व लाथा-बुक्क्यांनि मारहाण केली.यामधे दळणकार याचा उपच्यारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मृतक निलेश दळणकार महावितरण कपनित नोकरीवर होते.तसेच त्यांची पत्नीसुध्दा महावितरण कपनित नोकरीवर असल्याचे समजते.फिर्यादी श्रीमती देवकाबाई काशिनाथ दळणकार वय 55 वर्ष यांच्या फिर्यादी वरुन याप्रकरनी भादवीच्या कलम 307,323,504,506,452,34 नुसार दहीहंडा पोलिसानी गुन्हा दाखल करुन आरोपिना अटक केली आहे. मृतकाच्या मागे आई, पत्नी व 1वर्ष्याचा मुलगा, असा परिवार आहे.पुढिल तपास दहीहंडा पोलिस करित आहेत.
अधिक वाचा : येणाऱ्या काळामध्ये भारतीय संस्कृतीला जोपासण्याची अत्यंत आवश्यकता असे मत अँड. श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola