*बचतगट आणि मनरेगा च्या माध्यमातून महिलांनी दुहेरी रोजगाराकडे वळण्याची गरज
अडगाव बु (दिपक रेळे)- रस्त्यांच्या कामासाठी सध्या सगळीकडे हजारो-लाखो वृक्षांची वारेमाप कत्तल केली जात असल्याने तापमान प्रचंड वाढले आहे. आणि पाण्याची पातळी सुद्धा सतत खालावत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून यावर उपाययोजना म्हणून वृक्षांची कत्तल करण्या एवजी त्या झाडांना योग्य ठिकाणी पुनर्स्थापित करणारी ट्री रिलोकेशन प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी अ.भा.ग्रा. पत्रकार संघ हिवरखेड यांनी जिल्हाधिकारी आणि ceo ह्यांना पत्राद्वारे केली होती. त्यावर बोलताना ट्री रिलोकेशन प्रक्रिया राबविण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जलसंधारणाच्या कामामुळे आपले गाव आणि परिसर पाणीदार व्हावे यासाठी अडगांव येथील शेकडो ग्रामस्थ निस्वार्थपणे रोज श्रमदान करीत आहेत त्यांचा उत्साह वाढावा आणि जलसंधारणाच्या कामांना गती मिळावी यासाठी दि 1में रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त अडगांव बु. येथे पाणी फौंडेशन च्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये दैनंदिन श्रमदान करणाऱ्या शेकडो महिला पुरुषांसह जि प अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हा परिषद अकोला चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आयुष प्रसाद, जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, सरपंच सौ रुख्मिणी डाबेराव, तहसीलदार संतोष येवलीकर, नायब तहसीलदार सुरळकर, गुलाबसिंग डाबेराव, मायाताई म्हैसने, महेश गणगणे, किशोर कोल्हे, अडगांव पत्रकार संघाचे निलेश पत्की, अशोक घाटे, माणिक घाटे, विठ्ठल बागडी, दीपक रेळे, पुरुषोत्तम निमकर्डे,अ.भा.ग्रा.पत्रकार संघ हिवरखेड चे राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, धिरज बजाज, पाणी फौंडेशन चे शे जमीर, अमोल मसुरकार,राजू मांडवगडे, अमोल खंडारे, सुषमा लासुरकार, भिमकन्या धाबे, अजमत भाई, सुधाकर वानखडे, यांचे सहित अनेक मान्यवरांनी आणि 300 च्या वर स्वयंसेवकांनी श्रमदान केले. सदर महाश्रमदानात लहान मुलांनी उत्साहात सहभाग घेऊन आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांनी श्रमदान करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी आयुष प्रसाद यांनी त्यांना केक भरविला.यावेळी संबोधित करताना ceo आयुष प्रसाद यांनी श्रमदात्यांचे कौतुक केले आणि महिला सक्षमीकरणासाठी बचत गट आणि मनरेगा यांच्या सोबतच इतर प्रशिक्षण घेऊन दुहेरी रोजगार मिळवावा असे सांगितले.यावेळी अनेक मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत.
अधिक वाचा : अकोट तालुक्यात हिरव्यागार वृक्ष्याची खुलेआम कटाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola