तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा पंचायत समितीच्या आवारात असलेल्या क्वाटर मध्ये २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची बाब २ वाजता उघडकीस आली.
तेल्हारा पंचायत समितीचे कर्मचारी सुरेश भोजने हे पंचायत समिती क्वाटर मध्ये वास्तव्यात असून ते आज आपल्या कर्तव्यावर गेले असता व आई अकोट येथे काही कामा निमित्य गेली होती. यावेळी करण भोजने हा घरी एकटाच होता. २३ वर्षीय करण भोजने याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी २ वाजता उघडकीस आली.करण हा पुणे येथे नोकरी करीत होता काही दिवसांपूर्वी तो घरी आला होता. मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेल्या करणने आत्महत्या केल्याने मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.पंचायत समिती आवारात आत्महत्या केल्याची बाब कळताच शहरात एकच खळबळ उडाली होती.आत्महत्या चे कारण अद्याप कळू शकले नसून तेल्हारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा : दहावीच्या परीक्षेच्या ताणामुळे 3 विद्यार्थिनींनी प्राशन केले उंदीर मारण्याचे औषध; दोघींचा मृत्यू एक अत्यवस्थ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola