अकोला (प्रतिनिधी) : काल दि.२५ फेब्रुवारी ला महाराष्ट्र राज्यातील मुकबधिर कर्णबधिर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुणे येथील आयुक्तालयावर आंदोलन करण्यात आले होते. परंतु या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला त्यामध्ये १२ पेक्षा जास्त आंदोलनकर्ते जखमी झालेले आहेत. त्या घटनेचा सर्व स्तरावरुन निषेध होत असतांना आज दि.२६ फेब्रुवारी रोजी अकोला येथे भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा महानगर च्या वतिने अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य सचिव हितेश जामनिक, अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, अकोला जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ, राज्य सदस्य राजकुमार दामोदर, योगेश किर्तक, विकेश जगताप, प्रसिद्धी प्रमुख प्रतुल प्रभाकर विरघट, महानगराध्यक्ष आकाश गवई, धिरज इंगळे, महासचिव पवन गवई, मिलिंद वानखडे, अकोला तालुकाध्यक्ष पंकज दामोदर, सुबोध गवई, जयराज चक्रणारायण, रौनक वानखडे, पंकज खंडारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोल्यातील मोठी उमरी रस्त्याचे काम दर्जाहीन,शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola