वाशीम : गोवर-रुबेलाच्या लसीकरणानंतर एका दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. या लसीच्या रिअॅक्शनमुळेच बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर आरोग्य विभागाने शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.
‘गोवर-रुबेला’ आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनस्तरावर लसीकरण मोहीम राबविली जात आहे़ ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून वाशीम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयस्तरावर सुरू आहे़ या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळेत ही लस देण्यात आली. यामध्ये आंबेडकरनगरमधील पल्लवी इंगोले या विद्यार्थिनीला रिअॅक्शन झाल्याने तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालात उपचार करण्यात आले़ त्यानंतर तिला ५ डिसेंबर रोजी पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. इथे उपचाराने प्रकृती सुधारल्यानंतर १० डिसेंबरला सुट्टी देण्यात आली. पण, त्याच दिवशी रात्री पुन्हा मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मंगळवारी मृत्यू झाला.
वाशीम जिल्ह्यातील १ लाख ३० हजारांवर विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले़ यादरम्यान ३० विद्यार्थ्यांना मळमळ, गरगरणे, खाज येणे असा त्रास जाणवल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. काहींना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ या मुलीला २७ नोव्हेंबर रोजी लस देण्यात आली होती़ त्यानंतर तिला रिअॅक्शन झाल्याने उपचारानंतर सुटी देण्यात आली होती़ आठवड्यानंतर तिला दुसऱ्या आजारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. लसीकरणामुळे मृत्यू होणे अशक्य आहे़ शवविच्छेदनानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल, असे वाशीमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले.
नगरपालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेत पल्लवी दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती़ तिला यापूर्वी कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. तिला २७ नोव्हेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली़ तेव्हापासूनच तिला गरगरणे, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. काही दिवस जिल्हा सामान्य रुग्णालय व त्यानंतर अकोला येथे उपचार करण्यात आले़ त्यानंतर तिची प्रकृती चांगली असल्याचे सांगून सुटी देण्यात आली. मात्र, त्याच रात्री तिला त्रास झाल्याने उपचारासाठी दाखल केले असता दुपारी मृत्यू झाला़ पल्लवीचा मृत्यू लसीकरणाच्या रिअॅक्शनमुळेच झाल्याचे आमचे ठाम मत असून या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे, असे सावित्रीबाई इंगोले यांनी सांगितले.
अधिक वाचा : अट्टल कार चोरट्यास एलसीबीनं केलं अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1