मुंबई : दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता साजिद खान च्या अडचणीत भर पडली आहे. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याची गंभीर दखल इंडियन फिल्म अँड टेलीव्हीजन डायरेक्टर असोसिएशनने घेतली आहे. त्याला १ वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.
‘मी टू‘ मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी साजिदवर आरोप केले होते. यानंतर अक्षयने त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याने साजिदचे या चित्रपटातील दिग्दर्शक पद रद्द केले गेले. साजिदवर झालेल्या या सर्व गंभीर आरोपांनंतर भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं साजिद खानला नोटीस पाठवली होती. या नोटीसला साजिदने उत्तर दिले होते. पण त्याचे मुद्दे खोडून काढत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्रा, राचेल व्हाइट आणि पत्रकार करिश्मा उपाध्यायने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याशिवाय काही महिलांनी साजिदबद्दलचे धक्कादायक अनुभवही शेअर केले होते.
अधिक वाचा : उत्तराखंडमध्ये ‘केदारनाथ’वर बंदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola