अकोला- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचा माहे ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या विशेषांकाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते नुकतेच अकोला येथील एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक सर्वश्री हरिष अलीमचंदाणी, गिरीश गोखले, अशिष पवित्रकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, माजी जि.प. अध्यक्ष दादासाहेब मते, माजी नगरसेवक गोपीभाऊ ठाकरे, डॉ. आर.एन. भांबुरकर, डॉ. अनिरुध्द भांबुरकर, डॉ. प्रशांत वायाचाळ, दीपक मायी, आरती लडडा, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकराज्यच्या माहे ऑक्टोबरच्या विशेषांकात महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त परिवर्तन ह्या सूत्राने महाराष्ट्रात होत असलेल्या परिवर्तनाची स्पंदने टिपण्यात आलेली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींविषयी ‘युगपुरुषाचा आदर्श’ हा लेख लिहून महात्मा गांधींच्या मार्गदर्शक वाटचालींचा व विचारांची वाटचाल मांडून आपली आदरांजली व्यक्त केली. या विशेषांकात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात होत असलेल्या परिवर्तनाच्या यशकथा मांडण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसाठी कंपनीकडून होणार वसुली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola









