तेल्हारा (सुनीलकुमार धुरडे) – काल तेल्हारा तालुक्यात गौरव जल रत्नाचा प्रमाणपत्र वितरण व जाहीर सत्कार कार्यक्रम संम्पन्न झाला. या वेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मा. संध्याताई वाघोडे (जिल्हा परिषद, अध्यक्ष) होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. अशोकराव अमानकर (उपजिल्हाधिकारी) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना , मा. राजपूत साहेब उपविभागीय अधिकारी महसूल अकोट विभाग, मा. नरेंद्र सुभाषराव काकड साहेब (जिल्हा समन्वयक) मा. संतोष यावलीकर तहसीलदार साहेब, संघपाल वाहूरवाघ (तालुका समन्वयक) बार्शीटाकळी,तेल्हारा तालुका समन्वयक प्रशांत गायगोळ ,शंशाक उज्जनकर मंचावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर मंडळी चे स्वागत उपस्थितांनी तीन टाळ्या व फुल देऊन केलेत.
त्या नंतर गावकऱ्यांना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, पत्रकार मंडळी यांना सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 3 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्धल प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी तालुका समन्वयक, तांत्रिक प्रशिक्षक, सामाजिक प्रशिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मा. नरेंद्र काकड सर यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत गायगोले यांनी तर आभार संघपाल वाहुरवाघ यांनी मानले.
अधिक वाचा : अकोट शहर पोलिसांचे अवैध गुटख्यावर धाड सत्र सुरूच,४०हजाराचा मुद्देमाल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola