अकोला : आर्थिक दृष्टया मागास घटकातील उदयोजक बनू इच्छीणा-या व तशी क्षमता असलेल्या तरूण वर्गाला आर्थिक सहाय पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उदयोजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे नविन तीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्याचा लाभ तरुण बेरोजगारांनी घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज सदर विषयावर बैठक झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा खणीकर्म अधिकारी अतुल दौड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तरेनिया, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक भूषण भोईटे आदींसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. भोईटे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, यो योजनेतंर्गत वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना आहे, यात लाभार्थ्याला रूपये 10 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज घेता येते. दुसरी गट कर्ज व्याज परतावा योजना असून यात रूपये 50 लाखापर्यंत कर्ज घेता येते. तर शेतकरी उत्पादक गट करीता कर्ज योजना आहे.
या योजने अंतर्गत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर अदा केल्यास लाभार्थ्यांना तसेच गटांना व्याजाचा परतावा त्यांच्या आधारलिंक बँक खात्यावर महामंडळातर्फे दिले जातो. योजनांच्या अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला यांचेकडे प्रत्यक्ष किंवा दुरध्वनी क्रमांक 0724-2433849 / 8087101768 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सूचित केले.
या योजनांचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी करुन बँकांनी सदर योजनेतंर्गत दाखल झालेले प्रकरणं तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचना केली.
दरम्यान या बैठकीत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत या योजनेतंर्गत 86 हजार 676 जणांचा विमा काढण्यात आला आहे. या संख्येत आणखी भर पडणार आहे. बँकांनी तातडीने या योजनेतंर्गत प्राप्त प्रलंबित अर्जदारांचा विमा काढण्याची प्रक्रीया जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
तरुण शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वावर’ योजनेबाबत श्री. खवले यांनी यावेळी माहिती दिली. या योजनेतंर्गत व्यवसायासाठी 500 तरुणांना ई-कार्ट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरीता कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
अधिक वाचा : प्रहार आश्रमशाळा संघटना संपाबाहेर इतर संघटनांना अंशत: पाठींबा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola