अडगाव बु(गणेश बुटे)– २०१५ साली भारत सरकारने कौशल्य विकास (स्किल इंडिया ) या योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे या व्यवसाय शिक्षणा अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये दोन व्यवसाय शिक्षण विषय सुरू करण्यात आलेले आहे त्यासाठी पंचवीस पंचवीस अशी विद्यार्थी संख्या निश्चित केलेली आहे.
जिल्हा परिषद विद्यालय आडगाव बु. येथे सन २०१५ पासून व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण मोफत मिळणार असल्याची माहिती व्यवसाय प्रशिक्षक प्रा.अभिजित लोखंडे यांनी दिली.शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण हे राज्य शासनाच्या *राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान* हे प्रकल्प अमंलबजावणी व व्यवस्थापनाचे मुख्य कार्य करते लेंड-अ-हॅण्ड-इंडिया, पुणे ही संस्था सनियंञन व मूल्यमापन करीत आहे.तर शाळेमध्ये व्यवसाय शिक्षण हे विद्यार्थ्यांना नववीपासून बारावी पर्यत हिंदी विषयाला पर्याय विषय म्हणून असलेल्या व्यवसाय शिक्षणातील कोणताही एक विषय घेऊन शिक्षण पुढे चालू ठेवता येते .जिल्हा परिषद विद्यालय आडगाव बु येथे रिटेल मॅनेजमेंट व हेल्थ केअर हे दोन व्यावसायिक विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे .नुकत्याच लागलेल्या वर्ग दहावीच्या बोर्डाच्या निकालांमध्ये रिटेल या विषयांमध्ये कु. नेहल चतुर सिंह बैस व कु. कोमल मिलिंद वानखडे या विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० गुण मिळवून अमरावती विभागातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे .त्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे. तसेच हेल्थकेअरची विद्यार्थिनी कुमारी चैताली केशव धामोडे हे नि १०० पैकी ९० गुण मिळून शाळेमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे,सदर यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेचे रिटेल व्यवसाय शिक्षक श्री अभिजित लोखंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक भारसाकळे सर तसेच श्री गणेश पाटील सर (प्रकल्प समन्वयक एम्पावर प्रगती) ,श्री प्रकाश पाटील सर (जिल्हा प्रकल्प समन्वयक – लेंड-अ-हाँड-इंडिया पुणे) रिटेल व्यवसाय शिक्षक श्री अभिजित लोखंडे व हेल्थकेअर शिक्षिका सोनी हागोने व आपल्या आई वडिलांना देतात.