फिफा वर्ल्ड कप चा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या ब्राझीलला बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीतच२-१ने गारद केलं आहे. यामुळे वर्ल्डकप जिंकण्याचं नेमारचं स्वप्न भंगलं आहे तर बेल्जियमने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
कझान शहरातील मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांकडून आक्रमक खेळी केली जात होती. पण १३व्या मिनिटाला बेल्जियम च्या एडन हजार्डने बॉलला किक मारली असता तो अडवण्याच्या नादात ब्राझीलच्या फर्नांन्डिनोच्या खांद्याला लागून सरळ ब्राझीलच्या गोलपोस्टमध्ये शिरला.
ब्राझीलच्या खेळाडूच्या या चुकीमुळे बेल्जियमने १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर बेल्जियमच्या केव्हीन डी ब्रुनेने ३३व्या मिनिटाला गोल डागून बेल्जियमची खेळावरील पकड अधिकच घट्ट केली. मध्यंतरापर्यंत ब्राझीलला एकही गोल करता आला नाही.
मध्यतरानंतर ७८व्या मिनिटाला ब्राझीलसाठी रेनोटो ऑगोस्टोने पहिला गोल केला.पण त्यानंतर एकही गोल करण्यात ब्राझीलला यश आलं नाही. निर्धारीत ९० मिनिटांचा खेळ संपला तेव्हा बेल्जियम २-१ने आघाडी कायम ठेवली होती.त्यानंतर ५ मिनिटांचा स्टॉपेज टाइम देँण्यात आला. यातही ब्राझीलला गोल करण्यात यश आलं नाही.
अधिक वाचा : क्रिकेट सह अन्य खेळांवरील सट्टा वैध करा – विधी आयोग