तेल्हारा (शुभम सोनटक्के) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या अंतर्गत 33 के व्ही उपकेंद्र मनाट्री येथे भांबेरी वीज वितरण केंद्र येथील कनिष्ठ अभियंता श्री पी टी जाधव यांच्या हस्ते दि 01 जुलै2018 रोजी पर्यावरण दिन निमित्ताने वृक्षरोपण करण्यात आले.
राज्य सरकार च्या आदेशानुसार झाडे लावा झाडे जगवा या संकल्पना नुसार वृक्ष रोपण करण्यात आले सुमारे 10 जातीच्या वेगवेगळ्या वृक्ष या वेळी उपस्थित मान्य वार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जाधव सर यांनीप्रत्येक व्यक्ती ने वृक्ष लागवड करावी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले, यावेळी कार्यक्रमाला यंत्रचलक श्री सोळंके, सानप, वरिष्ठ तंत्रज्ञ श्री माकोडे, दळणकर,कनिष्ठ तंत्रज्ञ श्री वानखडे, अफसर शाह, पी डी इंजेपवाड, मकसूद अली, कूचके,गजानन मळघणे, संदीप शेकोकार, सोपान कसूरकर,सुरक्षारक्षक वानखडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अफसर शाह यांनी तर आभार प्रदर्शन परमेश्वर इंजेपवाड यांनी केले.
अधिक वाचा : केळीवेळी येथील सखाराम महाराज विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा एक आदर्श उपक्रम