• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोकजागर मंच पुढाकाराने विदर्भात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप परिषद

Our Media by Our Media
March 8, 2023
in Featured, अकोला, आंतराष्ट्रीय, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
Start up Conclave
12
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- विदर्भातच नव्हे तर राज्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘स्टार्ट अप परिषद’ लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने पार पडत आहे. येत्या ११ मार्च रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे लोकजागर मंच, डक्सलेजीस अटर्नीज व एलईएस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी यशस्वी स्टार्ट अप उद्योजकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये अशा स्टार्ट अप परिषदा होत असतात. मात्र पहिल्यांदाच ग्रामीण भागात अशी परिषद होत असून त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञ्ज संबोधित करणार आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

‘स्टार्ट अप कॉन्क्लेव्ह २०२३’ ही एक दिवसीय परिषद अकोट येथील झुनझनवाला अतिथी भवनात पार पडणार आहे. डक्सलेजीस अटर्नीज या बौध्दिक संपदा क्षेत्रातील अग्रगण्य विधी संस्थेचे तज्ञ्ज या परिषदेला संबोधित करणार आहेत. लोकजागर मंचातर्फे विदर्भातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिला, शेतकरी आणि युवकांच्या आर्थिक प्रगतीसाठी लोकजागर मंच आणि अनिल गावंडे यांनी एक विशेष मोहीमच उघडली आहे. स्टार्ट अप कसे स्थापन करावेत, त्यांचे व्यवस्थापन, त्यांना आवश्यक त्या सवलती मिळविण्यासाठी करावयाच्या नोंदणी यांची माहिती या परिषदेत आयोजित कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट यांचे व्यवसायाच्यादृष्टीने महत्व स्पष्ट करण्यात येणार आहे. या परिषदेला डक्सलेजीस अटर्नीजचे प्रमुख आणि बौध्दिक संपदा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित व्यक्तिमत्व दिव्येंदू वर्मा, त्यांच्या सहकारी स्फूर्ती दलोद्रिया, एलईएस इंडियाच्या प्रमुख आणि नवी दिल्लीतील नामांकित एड. श्रीमती रिचा पांडे संबोधित करणार आहेत.

यावेळी नोकिया मोबाईल समुहाचे आयपी विभाग प्रमुख डेनिस डंकन हे अमेरिकेतील न्यू जर्सीहून, डक्सलेजीस आयपीएलएलसीचे प्रमुख पा एस जॅलो हे वाशिंग्टनहून  आणि  अल्फ्रेड मानं फाऊंडेशनच्या आयपी अटर्नी श्रीमती हीना शर्मा या लॉस एंजेलिसहून या परिषदेला ऑनलाईन पध्दतीने संबोधित करणार आहेत. परिषदेसाठी पूर्व नोंदणी केलेले तरूण-तरूणी,उद्यमशील युवक आणि महिला बचत गट असे किमान ३०० जण या परिषदेत सहभागी होत आहेत.

यशस्वी उद्योजकांचा होणार सत्कार स्टार्ट अप क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या यशस्वी स्टार्ट अप्सचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे अलिकड़ेच सर्वोत्तम स्टार्ट अपचा पुरस्कार प्राप्त करणारे मुंबई येथील समीर जोशी यांचा यावेळी विशेष सन्मान केला केला जाणार आहे. समीर आणि डॉ. सीमा जोशी हे ट्रान्सेंडर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या अर्कानम टेक्नॉलॉजीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखील राठोड, संशोधक आणि ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य कोत्तावार आणि नेव्हो मोबाईल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन कोमरे यांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे. या सर्व सत्कारमूर्तींची यावेळी भाषणे होणार असून ते उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

Previous Post

डाक अदालत शुक्रवार (दि.10)

Next Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: 153 उमेदवारांचा सहभाग; 72 जणांची प्राथमिक निवड

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: 153 उमेदवारांचा सहभाग; 72 जणांची प्राथमिक निवड

चित्ररथ

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ १४९ गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.