अकोला (प्रतिनिधी)- हिरो बनण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. त्यातील काहींचेच स्वप्न सत्यात उतरते. याच विषयावर भाष्य करणारा ‘सातारचा सलमान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाचा आऊट झाला आहे. ‘स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात’, अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 3 मार्च 23 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘सातारचा सलमान’ या सिनेमामध्ये,”साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघताना दिसत आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेली मदत दिसत आहे”. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का? याचं उत्तर मात्र ‘सातारचा सलमान’ हा सिनेमा पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला, ‘सातारचा सलमान’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमे सांभाळली आहे. या सिनेमात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, ईलाक्षी मोरे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल, याचा ट्रेलरवरुन अंदाज आला आहे.
हेमंत ढोमे ‘सातारचा सलमान’ या सिनेमाबद्दल म्हणाला,”प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो आणि या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी अशी वेळही येते की, आता सगळं संपलं, असं वाटतं. मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण आपलं काम करत राहावं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, ही ऊर्जा देणारा हा सिनेमा आहे. एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल”.
हिंदी आणि मराठी चित्रपटांसह एक्टिंग मॉडेलिंग आणि फॅशनच्या दुनियेत नाव कमावलेल्या मूळच्या अकोल्याच्या इलाक्षी मोरे हिला पाहण्याची संधी आहे. अकोल्यातील मुलगी तिच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये करीत असलेल्या उज्वल करिअरबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.