शिर्डी – महाराष्ट्र राज्यातील सरपंचासाठी कार्यरत असलेल्या, सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श तयार करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केले जाते.त्याच बरोबरीने आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने विविध उपक्रम राबवित असतात.त्याचाच एक भाग म्हणून ‘ मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ या राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने ‘ मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा ‘ राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोहळा – २०२० शुक्रवार दि.२२ जानेवारी २०२१ दुपारी १-०० वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संस्थापक सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी दिली.या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात हे राहणार असून या पुरस्काराचे वितरण खा.सदाशिवराव लोखंडे,पालक मंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, कृषी मंत्री ना.दादा भुसे,नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे,समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख,आदर्श प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,नेत्ररोग तज्ञ पदमश्री डॉ.तात्याराव लहाने,समाजसेविका डॉ.सुधा कांकरिया,ग्रामसेवक संघटनेचे राज्यध्यक्ष एकनाथराव ढाकणे,श्री.महिला गृह लिज्जत पापड,पुणे चे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते यांच्या शुभहस्ते होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,मानचिन्ह, फेटा व शाल असे राहणार आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच,उद्योग भूषण, पत्रकारिता,युवारत्न, प्रशासकीय सेवा,सामाजिक, शैक्षणिक,कोरोना योध्दा,मीडिया, कृषी,व्यापार,कला, राजकिय,महसूल,वैद्यकीय,आध्यत्मिक, ऐतिहासिक,दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे.हा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक यादवराव पावसे,अध्यक्ष भाऊ मरगळे,राज्यध्यक्ष विक्रम भोर,मार्गदर्शक जयदीप वानखेडे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,स्वागताध्यक्ष प्रदीप हासे,कार्याध्यक्ष रवींद्र पवार, शंकरराव खेमनर,भाग्यश्री नरवडे,अँड भाऊसाहेब गुंजाळ,पंकज चव्हाण, रविराज गाटे, गणेश तायडे,अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम यांनी केले आहे.