अकोला – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका 2020-2021 करीता शुक्रवार (दि.15) रोजी मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी मुक्त,निर्भय व पारदर्शक वातावरणांत निवडणूका पार पाडण्याच्या दृष्टीने ठेवणे मा.राज्य निवडणूक आयोगाने खालीलप्रमाणे निर्देश निर्गमित केलेले आहे.
उपरोक्त निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधीत निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने,आस्थापना , निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगीक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी (दि.15) रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी. निवडणूक होणा-या ज्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगीक वसाहती (MIDC) तसेच महानगर पालिकेसारख्या मोठया नागरी वसाहती वसलेल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरी निमीत्ताने कामास येणा-या संबंधीत ग्रामपंचायतीं मधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने अशा मतदारांना उक्त नमुद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत देण्यात यावी. शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने दुकाने/कंपन्या/वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.
जिल्ह्यातील निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचे दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा, या करीता मतदानाचे दिवशी शुक्रवार (दि.15) रोजी सुट्टी जाहिर करणे/ सवलत देणे बाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
आयोगाचे आदेशांचे पालन न केल्यास संबंधीत आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.