अकोट (देवानंद खिरकर )-कत्तली करिता सहा बैलांना नेणारे वाहन अकोट ग्रामीण पोलिसांनि पकडले.वाहनातील सहा बैल ताब्यात घेऊन पोलिसांनी जिवदान दिले.4 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली.ही कारवाई 5 जुलै रोजी सायंकाळी पोपटखेड मार्गावर केली.कत्तलीसाठी वाहनातून बैलांना नेत असल्याची माहीती ठाणेदार फड यांना मिळालि.त्यांनी पोपटखेड- मोहाळा मार्गावर नाकाबंदी करुन एम एच 40 एके 0585 क्रमांकाचे वाहन अडविले.वाहनाची तपासणी केली असता,त्यात सहा बैलांना निर्दयतेने कोंबलेले दिसून आले.पोलिसांनी नाझीम खान उर्फ राजू दस्तगीर( 40 रा.अडगाव बु.ता.तेल्हारा)सैय्यद साबीर सैय्यद जलिल (24 रा.गाझी प्लॉट,हीवरखेड रोड अकोट)यांना अटक केली.वाहनामधिल 1 लाख 15 हजार किमतीचे 6 बैल व 3 लाख 50 हजार किमतीचे वाहन जप्त करण्यात आले.आरोपीविरुध्द कलम 5 (अ) ,9 महा,प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 11 (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागवीणे अधिनियम 1960 सहकलम 119 महा.पोलिस अधिनियम 1951 सहकलम 188,269 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई सुनिल सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार फड गुन्हे शोध पथक नारायण वाडेकर,प्रवीण गवळी,अनिल सिरसाट,गजानन भगत मोतिराम गोंडचवर यांनी केली.