मूर्तीजापुर (सुमित सोनोने):-
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती व पीक नुकसानीचा व खरडून गेलेल्या शेत जमिनीचा आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे व भाजपा मुर्तीजापुर ग्रामीण पदाधिकारी यांनी केला पाहणी दौरा
या दौऱ्यामध्ये कुरुम जिल्हा परिषद सर्कल मधील कवठा,खिनखिनी,माटोडा,धामोरी खु , धामोरी बु.,व माना जिल्हा परिषद सर्कल मधील कारली,जामठी,या गावांची नुकसान ग्रस्त भागांची पाहणी केली.व कारली येथील पाहणी वेळी पुलाखाली कचरा अडकलेला असल्याचे मा. आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ JCB बोलावून अडकलेला कचरा काढून रहदारीस रस्ता मोकळा करून दिला.तसेच हातगाव जिल्हा परिषद सर्कलमधील मोझर,बिडगाव,शिवण,गौरखेडी, हिवरा येथील दुबार पेरणी झालेल्या शेतांची पाहणी केली.या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.