• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात आर्थिक आणिबाणी लागू करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून निर्बंध लादताना आगामी सहा महिन्याचे नियोजन देखील जाहीर करावे – वंचित बहुजन आघाडी.

Team by Team
May 5, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
prakash ambedkar
13
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत कोरोनाचं संकट वाढल्याने राज्य सरकारने राज्यात आर्थिक आणिबाणी लागू केली असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा खात्यांना प्राधान्यक्रमात ठेवले असले तरी ह्या मध्ये पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार त्यामुळे समर्पित होणा-या ६७ टक्के निधीचे पुढील सहा महिन्याचे नियोजन आणि संघटीत – असंघटीत कामगार, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार ह्यांचे बाबतीत ठोस उपाययोजना आखण्याचा निर्णय घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. फडणवीसांच्या काळात रखडलेली ७२ हजार जागांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.मात्र कोरोना संकटामुळे कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थविभागाने दिले आहेत. परंतु आरोग्य सह पोलीस विभागातील भरती थांबविली जाऊ नये. कामं सध्या चालू आहेत, विविध योजना स्थगित करण्यात येणार आहेत, तर नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहेआरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना देखील ह्या मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.राज्यात पीपीए किट, एन ९५ मास्क व थ्री लेयर मास्क, सॅनिटायझर पुरेश्या प्रमाणात उपलध नाही.शासकीय कर्मचा-याचे पगार हे मार्च, एप्रिल चे थकीत आहेत. जून मध्ये तर पगार मिळेल ह्याची शाश्वती नाही.आर्थिक वर्षात कोणत्याही नव्या योजनांवर बंदी आणली आहे.आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश असून यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली होणार नाही. पुढे ढकलण्यासारख्या योजनांना विभागांनी आपल्या स्तरावर स्थगित घोषित करणे व योजना रद्द करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत दिली आहे.अशा रीतींने राज्यावर आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शासकीय तिजोरीची तूट भरणे आवश्यक आहे मात्र समर्पित होणारा ६७ टक्के निधीचे नियोजन मात्र सरकारने सांगितले नाही. हा आकडा सरकारच्या महसुली वसुली पेक्षा किती तरी अधिक आहे. त्यामुळे त्याचे नियोजन तातडीने जाहीर होणे गरजेचे आहे. शेतक-याची रब्बी पिके घरात पडून आहेत. त्याची खरेदी शासनाने करून घेतली पाहिजे.सोबतच शेतक-यांना खरीप पेरणी मशागती करीता बियाणे व खते आणि दहा हजार रोख शेतक-यांना दिली पाहिजे.बाजार समित्यांनी खरीपाच्या पिकातून हे हा खर्च वसूल करता येईल.रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत. ती शारीरिक अंतर राखून तातडीने सुरु करण्यात यावी व शहरी भागात देखील १०० दिवस रोजगार देण्याची योजना राबविण्यात यावी अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे. जनतेवर नुसते निर्बंध लादु नये तर त्या सोबत माणसे जगली पाहिजे ह्याची उपाययोजना देखील करावी अशी अपेक्षा वंचितने व्यक्त केली आहे.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार

Tags: राजेंद्र पातोडे
Previous Post

कोरोनाच्या महामारीत डॉक्टरचे कोरोनाबाधित रुग्णा सोबत अश्लील चाळे; डॉक्टर निलंबित

Next Post

जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
jee main exam 2020

जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये

liquor shop alcohol daru

एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अकोला जिल्हयातील तळीरामांसाठी खुशखबर, उद्या पासून मद्यविक्रीला प्रशासनाची परवानगी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.