अकोला- कोरोनामुळे देशभरात हाहाकार माजला असून केंद्र सरकारने अटी शर्थी ठेऊन मद्यविक्रीला परवानगी दिली त्यानंतर आज अकोला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिली असून एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे तळीरामांसाठी खुशखबर दिली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मद्य विक्रीला प्रशासनाने परवानगी दिली आहे.
अकोला जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून अकोला महानगर हद्दीत पहिले असलेला कोरोना आता गावागावात पसरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीला महानगरपालिका क्षेत्र वगळता इतर ठिकाणी परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात महानगर हद्दीतील तळीराम ग्रामीण भागात आपली दारूची भूक मिटवण्यासाठी जाऊन कोरोनाचा पादुर्भाव वाढवू शकतो. याचा प्रशासनाने विचार करून योग्य त्या उपाययोजना करव्या अशी मागणी होत आहे. मात्र प्रशासनाने मद्य विक्रीला परवानगी दिल्याने तळीराम मात्र खुश झाले आहेत. हे विशेष.
जिल्हयात परवानगी दिलेले दुकाने कमी असल्याने होऊ शकते गर्दी
जिल्हयात काहीच ठिकाणी शासनाने परवानगी दिलेल्या अटी शर्थी मध्ये बसणार अशी काहीच दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात तळीराम बाहेर निघून ज्या ठिकाणी मिळणार त्या ठिकाणी जाऊन मद्य घेण्यासाठी वर्दळ मोठ्या प्रमाणात करतील.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार